टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक २९/८/२०२३
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती निमित्त आज (ता.२९) सकाळी ११ वाजता भवानी माता मंदिर परिसर सराफ बाजार येथे प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली. यावेळी माल्यार्पण सराफ बाजारातील प्रकाशशेठ दापोरेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगीआरती रूपाली वाघ यांच्याहस्ते करण्यात आली.
सराफ बाजारातील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद विसपुते, प्रदिप सोनार, संजय भामरे, अनिल बाविस्कर, प्रमोद सोनार,शंकर अहिरराव, हरिष जगताप, कैलास सोनार, सुरेश सोनार, अमृतशेठ विसपुते, ज्ञानेश्वर बिरारी, मुन्ना जगताप, ज्ञानेश्वर भालेराव, चेतन मोरे, उमेश विसपुते, कल्पेश सोनार, शरद बागुल, किशोर दापोरेकर, शाम भामरे, प्रकाश जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागीर संस्था जि. जळगाव यांच्यावतीने २५ जणांना आर्टीजन स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी दहा जणांनी नवीन फार्म भरले. आर्टीजन स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुवर्ण कारागीर बांधवांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. हे स्मार्ट कार्ड जास्तीत जास्त सुवर्ण कारागीर बांधवांनी काढावे यासाठी विशेष जनजागृतीसुद्धा यावेळी केली गेली.