एरंडोल विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
संस्थेचे नाव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एक मताने मंजूर
उमेश महाजन, आवाज मराठी एरंडोल | १८ सप्टेंबर २०२३ |
एरंडोल – एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची ९७ वार्षिक सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन विजय पंढरीनाथ महाजन यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यात संस्थेचे नाव यापुढे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
वि का सह सोसायटीची ९७ वी वार्षिक सभा सिताराम भाई मंगल कार्यालय येथे सकाळी नऊ वाजता घेण्यात आली अनेक विषयांवर चर्चा होऊन सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेच्या मालकीची सिटी सर्वे नंबर ३१४ या जागेत नवीन व्यापार संकुल बांधणे एरंडोल विविध कार्यकारी सोसायटी हे नाव बदलून यापुढे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले विविध कार्यकारी सोसायटी हे नाव देण्यात यावे.अशा महत्त्वपूर्ण विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. यात सभासदांनी संस्थेच्या काही सभासदांना प्रोत्साहन परअनुदान आज पर्यंत मिळाले नाही. यासाठी संस्था पुन्हा प्रयत्नशील राहील असे आश्वासन देण्यात आले.
सभेला संस्थेचे चेअरमन विजय पंढरीनाथ महाजन, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन ,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, बाजार समिती माजी सभापती शालिग्राम गायकवाड,संचालक दुर्गादास महाजन,रमेश महाजन, रवींद्र महाजन,यांच्या सह शेतकर्यातून लढे सर अँड.ए.टी. पाटील यांच्यासह सभासदांनी आपले विचार व्यक्त केले. सदर सभेला संचालक राजेंद्र चौधरी, वामन दौलत धनगर ,पंडित लकडू पाटील ,व्हाईस चेअरमन निर्मला देवीदास महाजन , ईश्वर पाटील, राजधर महाजन, नितीन महाजन ,योगराज महाजन, सुमनबाई हरचंद माळी, जावेद मुजावर ज्ञानेश्वर पाटील, सुरेश देशमुख, इच्छाराम महाजन, रघुनाथ ठाकूर,यांच्यासह माजी संचालक आशीर्वाद पाटील, माजी नगरसेवक रुपेश रामा माळी, अरुण नामदेव पाटील ,राजेंद्र महाजन, गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल शामू पाटील मंचावर उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव बापू नामदेव पाटील प्रस्ताविक संस्थेचे चेअरमन विजय पंढरीनाथ महाजन तर आभार युवराज महाजन यांनी मानले.
यशस्वीतेसाठी मन्साराम माळी अशोक जोशी भगवान माळी, निंबा माळी, यांनी परिश्रम घेतले
यावेळी संस्थेचे सभासद अँड. विलास मोरे ,भास्कर पाटील, रवींद्र पाठक, सुदर्शन महाजन ,पंडित महाजन, रमेश निंबा महाजन, दत्तात्रय जोशी, प्रल्हाद पाटील, शेख सांडू, शर्मा सर भिका महाजन , सुनील महाजन प्रवीण महाजन यांच्यासह असंख्य सभासद उपस्थित होते.