जळगाव

पाणंद फाउंडेशन कार्य हे सर्वांना प्रेरणा देणारे

पाणंदतर्फे पुरस्कार वितरण आणि नली नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण

टीम आवाज मराठी जळगाव,दि.10-6-24- महाविद्यालयीन शिक्षण आटोपल्यावर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांनी एकत्र येत समाजासाठी एक चांगलं उदाहरण पाणंद फाऊंडेशनने निर्माण केले आहे. पोटापाण्याच्या व्यवसायासोबत उत्तम असं काम आपण करू शकतो आणि ते केवळ संघटन शक्तीतून करून दाखवता येतं अशा शब्दात पाणंद फाउंडेशनच्या कार्याचा गौरव ज्येष्ठ उद्योजक प्राध्यापक डी. डी. बच्छाव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुखा अतिथी म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमा भोळे, समाज कल्याण उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, प्राचार्य एल. पी. देशमुख, अजित वाघ, प्राचार्या संध्या सोनवणे, पुणे महानगरपालिकेतील उपायुक्त प्रतिभा पाटील, जी एस टीचे उपायुक्त सूर्यकांत कुमावत , नायब तहसीलदार रूपाली काळे कुमावत, ग स सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, पाणंदचे अध्यक्ष अमित तडवी,संस्थापक दिलीप बारी हे मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक दिलीप बारी यांनी केले. शंभू पाटील यांनी आपल्या भाषणातून नूतन मराठा महाविद्यालयाच्या वैचारिक परंपरेने प्रशिक सारख्या संस्थांनी वैचारिक अधिष्ठान दिल्याचे सांगितले. जयप्रकाश महाडिक, एल.पी. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कोरोना काळात धारावी झोटडपटटी परिसरात उत्तम काम करणारे मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी, पुण्यातील भिडे वाडा हे स्मारक व्हावे यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या व यशस्वी करणाऱ्या प्रतिभा पाटील , स्वखर्चातून विद्यार्थ्यांना घडविणारे कैलास तायडे , सायबर क्राईम मध्ये चांगले कार्य केलेले हेमंत महाडिक, गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी पकडण्यात यशस्वी झालेले राहूल बैसाने. गांजा, गावठी कट्टा सारख्या अनेक गुन्हेगारांना पकडून त्यांना जेरबंद करणारे सहायक पोलिस निरीक्षक देविदास पाटील या समाजात उत्तम काम करणाऱ्या सहा व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला. सन्मानानंतर परिवर्तन निर्मित श्रीकांत देशमुख लिखित शंभू पाटील नाट्य रूपांतरित योगेश पाटील दिग्दर्शित ‘नली’ नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. प्रकाश योजना अजय पाटील, राहुल निंबाळकर, पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी यांचे होते, निर्मिती नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे यांची होती. हर्षल पाटील यांच्या सादरीकरणाला खूप दाद मिळाली. याप्रसंगी संभाजी राजे नाट्यगृहात रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शितल पाटील यांनी केले. महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पाणंद फाउंडेशन या संस्थेची स्थापना काही वर्षांपूर्वी केली. अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात पाणंदचे सदस्य हे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम हाती घेऊन कार्य करीत आहे. या सामाजिक कार्यासाठी निधी जमावा यासाठी नली नाटय प्रयोगाचे आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय नेटकं आयोजन पाणंदच्या वतीने करण्यात आलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button