शिर्डीचे नाव सांगुन स्मशानभूमीत कर्जबाजारी यु़वकाची शिरसोलीत आत्महत्या

टीम आवाज मराठी, जळगाव | ३० जून २०२३ |येथील जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील कर्जबाजाराला संजय हरी पाटील (वय ३२) हा युवक मी शिर्डीला जातो असे सांगून घराबाहेर पडला, मात्र, त्यानंतर तो सरळ स्मशानभूमीत पोहचला आणि तेथील पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला त्याच्या शर्टाच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली. याबाबत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिरसोली येथील संजय पाटील हा युवक ट्रकड्रायव्हर म्हणून काम करीत होता. गुरुवारी सायंकाळी संजय पाटील हा शिर्डीला जातो असं सांगून घराबाहेर गेला नंतर त्याने गावामधील स्मशानभूमी गाठली आणि तेथील स्मशानभूमीत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला त्याच्या शर्टाच्या सहाय्याने गळफास घेवून संजय पाटील याने आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. संजय पाटील याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. सदर घटना निदर्शनास आल्यानंतर गावकरी थक्क झाले असून संपूर्ण गावात त्यांचे विषयी व्यक्त केली जात आहे.