जळगाव

परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवात यजुर्वेंद्र महाजन यांचा सन्मान

जिगीषा सन्मान महोत्सवात यजुर्वेंद्र महाजन यांचा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला

टीम आवाज मराठी जळगाव-गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे यजुर्वेंद्र महाजन यांना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानाने गौरविण्यात आलेला आहे जळगाव शहरात एक चांगल्या प्रकारचे मनोबल हे केंद्र दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या कल्पनेने आकाराला आलेला आहे या प्रकल्पासाठी त्यांनी अथक परिश्रमातून देशभरात नावलौकिक निर्माण केला आहे. सकारात्मक काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेतर्फे सन्मान करण्यात येत असतो. जिगीषा सन्मान महोत्सवात यजुर्वेंद्र महाजन यांचा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी मनोबाल प्रकल्पातील डॉ. रेखा महाजन , मानसी महाजन, संध्या सूर्यवंशी , ईशान नाईक, संगीता संघवी, दिव्यांग विद्यार्थिनी अमृता सूर्यवंशी यांच्या समवेत हा सन्मान स्वीकारला. याप्रसंगी अभिनेत्री मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे यांनी सर्वांना बोलतं पुस्तक देऊन गौरवले या प्रसंगी मंचावर यामिनी शहा , शितल जैन , सपना काबरा , हिना जैन , मंजुषा भिडे, अंजली पाटील, लीना लेले , जयश्री पाटील , नेहा पवार , राजश्री बारी, मानसी गगडानी या उपस्थित होत्या. मानपत्राचे वाचन प्रा. मनोज पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button