डॉ. अशोक सैदाणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
भारत सरकार आणि नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम मार्फत पुरस्कार वितरित
टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक २ ऑक्टोबर २०२३ | जळगाव येथील जळगाव शहर महानगरपालिका जळगाव शिक्षण मंडळ जळगाव येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक डॉ. अशोक पुंडलिक सैदाणे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना नुकताच धुळे येथे राज्य स्तरीय डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. अशोक सैदाणे यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारत सरकार आणि नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम कडून दि. १/१०/२०२३ रोजी श्री. गणपती स्वामीनाथन, कर्नल निवॄत भारतीय सेना, भाऊसाहेब शिवाजी अकलाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे गोरख देवरे, राष्ट्रीय अध्यक्ष, फोरम प्रफुल्ल पाटील, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र फोरम ईश्वर पाटील सचिव महाराष्ट्र राज्य, डॉ अतुल पाटील अध्यक्ष जळगाव तालुका यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. याबदृल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.