पाचोरा येथे अंगावर पेट्रोल ओतून तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न!
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील प्रकार

टीम आवाज मराठी, जळगाव | ०६ जुलै २०२३ | येथील भडगाव शहरातील खोटा चोरीचा आरोप लावल्याने एका तरुणाने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला सदर घटनेची माहिती पाचोरा पोलीसांना मिळताच पोलीसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सदर तरुणाला ताब्यात घेऊन पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भडगाव पेठ परिसरातील रहिवासी लक्ष्मण धुडकू पाटील यांच्यावर भडगाव येथील एका व्यापाऱ्याने खोटा चोरीचा आरोप लावण्यात आला असल्याची माहिती लक्ष्मण पाटील याने देत पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आज दि. ०६ जुलै गुरुवार रोजी ०१:३० वाजेच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करीत असताना पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल सुनील पाटील, पो.कॉ.विनोद बेलदार, सचिन पवार यांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने पुढील घडणारा अनर्थ टळला. सदर तरुणास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले.