उमेश महाजन, आवाज मराठी एरंडोल | १६ सप्टेंबर २०२३ |एरंडोल कडून जळगाव मार्गे छत्रपती संभाजी नगरला भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने पिंपळकोठ्या नजीक मित्तल कंपनीच्या समोर पुलावरील सिमेंटच्या कठड्याला धडक दिली व बस नाल्यात कोसळली यात दोन जण ठार झाले तर दहा ते बारा जण जखमी झाले ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पिंपळकोठ्यापासून एरंडोल कडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर घडली.
मुकेश कुमार शंकर लाल गुजर वय ३९ वर्षे राहणार दिवीपुरा बनी तालुका नवलगड जी जंजून राजस्थान व एक पंचवीस वर्षे अनोळखी इसम हे दोन जण ठार झाले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ए आर, ०१ वाय ०००९ या क्रमांकाची लक्झरी बस जळगाव मार्गे औरंगाबाद कडे जात होती पिंपळकोठा नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील एका छोट्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्याला या बसने धडक दिली व बस नाल्याखाली कोसळली ही बस राजस्थान कडून निघाली होती यातील बहुतांश प्रवासी हे छत्रपती संभाजीनगर येथे हात मजुरी साठी जात होते. या घटनेचे वृत्त समजताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल काशिनाथ पाटील राजेश पाटील,महेंद्र पाटील अनिल पाटील राहुल पाचपोळ , मिलिंद कुमावत संदीप पाटील अखिल मुजावर हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले यावेळी आरोग्य दूत विकी खोकरे, व पिंपळकोठा येथील ग्रामस्थांनी मदत कार्य केले पोलिसांनी जखमींना बाहेर काढून तात्काळ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील यांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयाला पाठवले,
अपघातातील जखमी पुढील प्रमाणे दिपेंद्र कुमार वय २८ वर्ष, कलाराम वय ३३ वर्ष, दिनेश कुमार वय ३० वर्ष रतनलाल कुमावत ४० वर्ष, जयराम कुमार ३२ वर्ष , महादेव कुमार ४५ वर्ष, राजेंद्र प्रजापति ४५ वर्ष, सिताराम कुमार ३८ वर्षे,, मुकेश गुजर २७ वर्ष, लक्ष्मी जहांगीड ५० वर्ष, अनोळखी इसम ४० वर्ष, अनोळखी तीस वर्ष.
अपघात प्रकरणी रतनलाल कुमावत यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून लक्झरी गाडीचा चालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंद वाडकर व एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली