जळगाव

मोबाईलचा स्फोट झाल्याने महिला जखमी

सावधान : मोबाईल चार्ज करतांना घ्या काळजी

टीम आवाज मराठी, जळगाव। ८ जुलै २०२३ । शहरातील गणेश कॉलनी परिसरातील एका चहा विक्रेत्याच्या पत्नीच्या मोबाईलचा स्फोट होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या महिलेने मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. काही वेळाने चार्जिंग वरून मोबाईल काढल्यावर त्यात जाळ झाला. त्यामुळे मोबाईल हातातून खाली पडल्यावर त्याचा स्फोट होऊन महिला किरकोळ जखमी झाली आहे.

किरण भगवान पाटील (वय ४५, रा. गणेश कॉलनी) यांचे गणेश कॉलनी परिसरातच चहाविक्रीचे दुकान आहे. या व्यवसायावरच त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. शनिवारी ८ जुलै रोजी सकाळी किरण पाटील त्यांची पत्नी सुवर्णा यांचेसह दुकानावर होते. तेव्हा सुवर्णा पाटील यांनी मोबाईल चार्जिंगला लावला. काही वेळाने मोबाईल चार्जिंगवरून काढल्यानंतर काही सेकन्दात जाळ निघाला. त्यामुळे घाबरून मोबाईल खाली पडला. तेव्हा मोबाईलचा स्फोट झाला.

यात महिला किरकोळ जखमी झाली आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. दरम्यान, घटनेची एकच चर्चा शहरात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button