जळगाव

रेशन दुकानाचा परवाना केला रद्द (Video)

अफवा पसरवणे शिंदे गटाच्या नगरसेवकाला पडलं महागात

टीम आवाज मराठी, जळगाव | २८ जून २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नागरिकांची उपस्थिती जास्तीत जास्त रहावी, यासाठी लढवलेली शक्कल रेशन दुकान मालकाच्या अंगाशी आली आहे. रेशन दुकानदार असलेले जळगाव शहरातील शिंदे गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमाच्या नावाखाली व्हाट्सअप ग्रुपवर मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमास हजर न राहिल्यास त्या कार्डधारकांचे तीन ते चार महिने रेशन बंद राहील, असा इशारा दिला होता. याची नोंद घेत दारकुंडे यांचा रेशन दुकान परवाना निलंबित करण्यात आला आहे.

सर्व रेशन कार्डधारकांना हजर राहणे बंधनकारक असल्याचे दारकुंडे यांनी व्हाट्सअप ग्रुप वर मॅसेज टाकले होते. या कार्यक्रमात महत्त्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत व कार्डधारकांची नोंद घेतली जाईल. त्यामुळे सर्व ग्राहकांनी हजर राहणे अनिवार्य असल्याचे दारकुंडे यांनी सांगितले होते.

पोलीस कवायत मैदान येथे पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात गर्दी खेचण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप वर लाभार्थ्यांची दिशाभूल निर्माण करणारे मॅसेज टाकले होते. यामुळे नागरिकांना कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे, यासाठी प्रलोभन दाखविले जात असल्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली होती. याचबरोबर नागरिकांना धमकविल्याचे आरोप देखील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. अशातच दारकुंडे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे हे प्रकार सत्य असल्यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button