धुळे

महिलेला अश्लिल मॅसेज पाठल्याने विमा कंपनीच्या व्यवस्थापकास बदडून धिंड

महिलेला अश्लिल मॅसेज पाठल्याने विमा कंपनीच्या व्यवस्थापकास बदडून धिंड काढून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

टीम आवाज मराठी, धुळे | ०४ जुलै २०२३ | : धुळे शहरातील एका महिलेला अश्लील मेसेज करणाऱ्या रिलायन्स इन्शुरन्सच्या सहायक शाखा व्यवस्थापकास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच बदडून काढण्यात आले. त्यास विमा कंपनीच्या कार्यालया बाहेर काढून चांगलेच बदडण्यात आले नंतर आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि नितीन सोमनाथ पाटील (वय ३४) असे बदडण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव असून त्याच्या विरोधात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आझाद नगर पोलीस ठाण्यात येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. “मुझे प्यार हो गया” असा अश्लील प्रकारचा मॅसेज त्याच विमा कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर व्यवस्थापक असलेल्या नितीन पाटील याने टाकला होता. याबाबत त्याला सूचना देऊनही त्याने अश्लील मॅसेज पाठवणे बंद न केल्याने पीडित महिलेने ठाकरे गटाकडे धाव घेतली.
त्यानंतर त्यांना घडलेली घटना सांगण्यात आली मग संतप्त झालेल्या ठाकरे गटाने धुळे शहरातील गल्ली नंबर सहा येथील रिलायन्स इन्शुरन्स येथील कंपनीत जाऊन सहायक शाखा व्यवस्थापकास चांगलाच बदडून काढण्यात आले. यानंतर रिलायन्स इन्शुरन्स या कंपनीच्या कार्यालयापासून ते आझाद नगर पोलीस स्टेशनपर्यंत सहायक शाखा व्यवस्थापकाला बदडून ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सदर व्यवस्थापकाची दिंड काढली. रिलायन्सच्या विमा कार्यालयापासून ते आझाद नगर पोलीस स्टेशनपर्यंत पायी नेऊन आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button