धुळे

मोठी बातमी : धुळ्यातील स्वर्ण पॅलेस ज्वेलर्स दुकानातून १ कोटी १० लाखांच्या दागिन्यांची चोरी

धुळ्यातील आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी

टीम आवाज मराठी, धुळे | ११ जुलै २०२३ |  धुळे येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या बंदोबस्ता मध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्यांनी आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज शेजारी असलेले स्वर्ण पॅलेस ज्वेलर्स दुकानातून तब्बल एक कोटी १० लाखांचे दागिने उडविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे धुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
धुळे शहरामधील वर्दळीच्या भागात समजला जणाऱ्या आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज शेजारी असलेले प्रकाश जोरावरमल चौधरी व सरदार जोरावरमल चौधरी यांच्या मालकीचे स्वर्ण पॅलेस हे सोने-चांदीचे सराफ दुकान आहे. दुकानाच्या सुरक्षतेसाठी रात्र-पाळीसाठी वॉचमनची नियुक्ती केली आहे. परंतु, काल अचानक वॉचमनला आपल्या मुलीच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी पुणे येथे जाणार असल्याने याबाबत त्याने सायंकाळी दुकानमालकाला फोन करुन सांगितले होते म्हणून तो सुटीवर होता. प्रश्न एका दिवसाचा असल्याने दुकानमालकाने पर्यायी सुरक्षिततेसाठी वॉचमन ठेवला नाही. वॉचमन नसल्याची संधी साधून चोरटयांनी मोटार-सायकलवर ट्रिपलशीट रात्री अडीच वाजेच्या सुमारास आले. आणि त्यांनी स्वर्ण पॅलेस ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातलेले असल्याने व चेहरा झाकला असल्याने त्यांच्यावर कुत्रे जोरजोरात भुंकत होते. तेव्हा कुत्र्यांच्या आवाजाने जवळच असलेल्या एका दुकानाचा वॉचमन उठून बघण्यासाठी आला. तेव्हा तिघे चोरटे आडोशाला लपले. पण तिथे कोणीच नसल्याची खात्री पटल्याने वॉचमन पुन्हा आपल्या जागी गेला. आणि चोरट्यांनी अगदी १५ मिनिटांत १ कोटी १० लाखांचे दागिने चोरी केले.ही घटना सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली. याच वेळी पोलिसांचे गस्तीचे पथक सायरन वाजवत आल्याने चोरट्यांनी पळ काढल्याने स्ट्राँगरूममधील १५ किलो सोने सुरक्षित राहिले.

आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस ज्वेलर्स दुकानाच्या मागील बाजूस शटरची पट्टी कापून दोन चोरटे सकाळी २.४० वाजता दुकानामध्ये आत जाऊन सीसीटीव्ही, केबिनची काच फोडून काउंटरमधील तसेच ड्रॉवरमधील सुमारे ७२० ग्रॅमचे दागिने,८०० ग्रॅम शुद्ध सोने, १० किलो चांदी, १० हजार रोख असे सुमारे १ कोटी १० लाखांचा ऐवज चोरी केला. चोरट्यांना ड्रॉवर व केबिनमधील स्ट्राँगरूम फोडता आले नाही त्यामुळे मोठे नुकसान टळले. पोलिसांचे गस्ती पथक सायरन वाजवत आल्याने २:५५ वाजता सदर चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, आझादनगर पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह ठसे तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. सोमवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पोलीस व्यस्त असतील व त्यामुळे पळ काढता येईल, असा चोरट्यांचा अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button