‘भीमस्मृति यात्रा’ एक उर्जा स्त्रोत : जयसिंग वाघ
धुळे लांडोर बंगल्यावर भीमस्मृति यात्रे निमित्त आयोजित कार्यक्रम
टीम आवाज मराठी, धुळे प्रतिनिधि | ३१ जुलै २०२३ | येथील धुळे लांडोर बंगला येथे गेल्या ३२ वर्षापासून सातत्याने दि. ३१ जुलै रोजी ‘ भीमस्मृति यात्रा ‘ संपन्न होत आहे , या निमित्त राज्यभरातून हजारो लोक याठिकाणी एकत्र येत असतात आणि विविध विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम घेतात तसेच मोठ्या प्रमाणात पुस्तकांचे दुकाने लागतात, विविध गावांमधून वाजत गाजत मिरवणूका येतात, माहेर वाशिण महिला आपल्या माहेरी येतात या व इतर घटनांनी ही यात्रा आंबेडकरी चळवळी तील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा, नवी दिशा देते म्हणूनच धुळे येथील भीमस्मृति यात्रा एक ऊर्जास्रोत आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.
धुळे येथील लांडोर बंगल्यावर भीमस्मृति यात्रे निमित्त आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात वाघ बोलत होते. जयसिंग वाघ यांनी आपल्या सविस्तर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटी विषयी तसेच लांडोर बंगल्यावरील मुक्कामा विषयी, पोळाच्या सणा निमित्त झालेला वाद, त्या वादा विषयी बाबासाहेबांनी न्यायालयात मांडलेली बाजू , जनतेला जाहीर सभेतुन केलेले मार्गदर्शन, जनतेने केलेले स्वागत, बाबासाहेबांनी धुळे शहरातील विविध ठिकाणी दिलेल्या भेटी, बस स्थानका मागील रेस्ट हाउस मधील निवास या बाबतही माहिती दिली.