जळगावधुळेनंदुरबार

एमसीईडी जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत महापरिनिर्वाणदिनी स्तुत्य उपक्रमांनी साजरा

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी प्रसंगी जशमनपा आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांच्या हस्ते

टीम आवाज मराठी, जळगाव | ६ डिसेंबर २०२३ |  येथील जळगाव शहरातील आज दिनांक ६ डिसेंबर २०२३ जळगाव रेल्वे स्टेशनवरील भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन प्रसंगी जळगाव शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ विद्या गायकवाड यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जळगांव आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष मुंबई यांच्या सहकार्याने

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ दिवसीय निःशुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाची माहिती देताना विवेक सैंदाणे प्रशिक्षण समन्वयक व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात शेकडो बेरोजगार तरुणांनी माहिती घेतली त्यापैकी जवळपास ६०-७० तरुणांनी नोंदणी करून घेतली असून दि १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा उद्योग केंद्र जळगांव येथे मुलाखती साठी उपस्थित राहणार आहेत.
सदरहू या कार्यक्रमास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे नाशिक विभागीय अधिकारी श्री अलोक मिश्रा व प्रकल्प अधिकारी श्री दिनेश गवळे, यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री नरेंद्र इंगळे, दिपाली सुरवाडे आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाठी अनुसूचित जाती जमाती व इतर प्रवर्गातीन सुशिक्षित बेरोजगारांची शेकडोंच्या संख्येने उपस्थित लाभली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button