जळगाव

पहूर पाळधीच्या ग्रामपंचायत कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न

सरपंच अॅडव्होकेट प्रशांत बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण

टीम आवाज मराठी जामनेर प्रतिनिधी | दि १५ ऑगस्ट २०२३ | आज देशात सर्वत्र १५ ऑगस्ट स्वांतत्र्य दिनाच्या निमित्ताने जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विद्यमान सरपंच अॅडव्होकेट प्रशांत बाविस्कर यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिना च्या निमित्त ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाची रूपरेषा सर्वप्रथम ध्वज फडकवण्यात आला राष्ट्रगीत झाले त्यानंतर सरपंच अॅडव्होकेट प्रशांत बाविस्कर यांनी आपले स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करत असताना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पाळधी गावाच्या विकासा संदर्भात मार्गदर्शन केले.


याप्रसंगी माजी सरपंच कमलाकर पाटील, इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी वर्ग सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर गावकरी वर्ग ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी साठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button