धक्कादायक! ८ वर्षीय मिसिंग मुलीचा मृतदेह आढळला कडब्याच्या ढिगाऱ्यात ….
गोंडगाव येथील गोठ्यात कडब्याच्या ढिगाऱ्यातील घटना

टीम आवाज मराठी भडगांव प्रतिनिधि | २ ऑगस्ट २०२३ | भडगाव तालुक्यातील अतिशय खळबजनक घटना समोर आली असून गौडगाव येथील बालिका दि. ३० रोजी मिसिंग झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. बलिकेचा मृतदेह गोंडगाव येथील गोठ्यामध्ये कडब्याच्या ढिगाऱ्यात आढळून आला. रात्री उशिरा घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी दाखल झाले.
हाती आलेले आधिक माहिती अशी कि, गोंडगाव येथील कल्याणी संजय पाटील ही ७ वर्षाची बालिका हरविल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वी संध्याकाळी ३० जुलै रोजी भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली. या बालिकेचा घटनेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी सदर गावातील गोठ्यात कडब्याच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत मोठी खळबळ उडाली ही माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते, भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.