महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ११ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ११ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन
जळगाव, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनामध्ये पर्यावरणपूरक उपक्रम, सामाजिक बांधिलकी, जनजागृती, शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षितता तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून अर्ज केवळ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरूनच स्वीकारले जाणार आहेत. इच्छुक गणेशोत्सव मंडळांनी दि ११ सप्टेंबर २०२६ पूर्वी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीप्रत्रकाद्वारे केले आहे.




