जळगाव

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने एक वर्षासाठी हद्दपार; कलम ५५ अंतर्गत कारवाई

जळगाव, प्रतिनिधी दिनाक-24-9-2026 :  एरंडोल शहर व परिसरात गुन्हेगारी टोळी तयार करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तिघांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये ही कारवाई केली. संबंधितांना आदेश मिळाल्यापासून दोन दिवसांत जळगाव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख शुभम कैलास महाजन (वय १८, रा. नागोबा मंदिर, एरंडोल), पवन प्रकाश मराठे (वय १९, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) आणि शुभम उर्फ झिंग्या दत्तात्रय पाटील (वय २५, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे.

एरंडोल पोलिस ठाण्यात या तिघांविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे, जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर जमाव जमविण्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. गुन्हा रजि. क्र. ९६/२०२५ मध्ये दोषारोपपत्र क्र. ७६/२०२५ दाखल करण्यात आले असून सेशन केस क्र. १६/२०२५ आहे. याशिवाय गुन्हा रजि. क्र. ३८/२०२६ मध्ये दोषारोपपत्र क्र. ४६/२०२६ दि. २६ जून २०२६ रोजी दाखल झाले आहे. या प्रकरणाचा एससीसी क्र. ११२/२०२६ आहे.

दरम्यान, तिघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून एरंडोल पोलिस ठाण्यात भा.ना.सु.सं. २०२३ चे कलम १२६ अन्वये प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हद्दपारीचे आदेश जारी केले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरुद्ध यापुढेही प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button