जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात
ध्यान, संगीत आणि फ्री-फ्लो डान्सने जळगावकरांना लाभले नवचैतन्य
जळगाव, प्रतिनिधी दिनाक-30-9-2026 : जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात उगवत्या सूर्याच्या साक्षीने जळगावकरांनी धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रम अनुभवला. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून आयोजित ही खास सकाळची जर्नी केवळ निसर्गभ्रमंतीपुरती मर्यादित न राहता ध्यान, लाइव्ह म्युझिक, फ्री-फ्लो डान्स आणि उत्तम खाद्यसंस्कृतीचा संगम घडवून आणणारी ठरली.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जिवने, जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर, उपवनसंरक्षक सौरेश सहाय, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, निशा जैन, शोभना अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, क्रेडाईचे राज्यउपाध्यक्ष अनिश शहा, यामिनी शहा, डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, प्रेम कोगटा, अथांग जैन, अंबिका जैन, अभेद्य जैन, आणि आंचल जैन यांच्यासह अनेक मान्यवरांनी उत्साहाने सहभाग घेतला.
अंबिका जैन, जयंतिका आणि सनम यांच्या पुढाकारातून जळगाव शहरात पहिल्यांदाच असा उपक्रम साकारण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी अंबिका जैन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, तर डॉ. अश्विन झाला यांनी जैन हिल्स परिसराची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबिका जैन, जयंतिका, सनम आणि जगदीश चावला यांनी विशेष परिश्रम घेतले.





