स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर
५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता.१८ ला आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव दि. १६ प्रतिनिधी – सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता.१८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्याहस्ते दिला जाणार आहे. १९९२ पासून सुरू झालेला हा पुरस्कार यापुर्वी स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषितज्ज्ञ जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, डॉ. प्रकाश आमटे, नेत्रतज्ज्ञ तात्यासाहेब लहाने, पद्मश्री डॉ. गणेश देवी, नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपूरे यांच्यासह इतर मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.