जळगाव

अमळनेरमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई….

शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत करणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई

टीम आवाज मराठी अमळनेर  प्रतिनिधि | २ ऑगस्ट २०२३ | येथील अमळनेर पोलिसांनी शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत करणाऱ्या गुन्हेगारावर  कारवाई केली. त्यांची पुणे येरवडा येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आरोपीचे नाव विशाल दशरथ चौधरी वय २७ असे आहे. अमळनेर शहरात भोईवाडा भागातील विशाल चौधरी हा शहरातील विविध दंगलीत सहभागी घेऊन  दहशत निर्माण करत असतात. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दरोडा लूट, तलवार घेऊन दहशत निर्माण करणे असे सहा दखलपात्र गुन्हे व एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हेड काॕ. किशोर पाटील व सिद्धांत शिसोदे यांच्या सहकार्याने एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे मंजुरीस पाठवला. प्रस्तावाला मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी ,रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला १ ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेड कॉ. कैलास शिंदे , घनश्याम पवार , सुनील पाटील यांनी आरोपी विशाल चौधरी यांस पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थलांतर करण्यासाठी रवाना झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button