जळगाव

जैन उद्योग समुहात योगा दिवस साजरा

उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली योग साधना

टीम आवाज, मराठी जळगाव। २१ जून २०२३ । जैन इरिगेशनच्या जैन अॅग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन हायटेक प्लान्ट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा यासह अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, गांधी रिसर्च फाऊंडेशन यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

आरोग्याविषयी सजग होत प्रशिक्षकांकडून योगाभ्यास समजून घेतला. स्वस्थ हृदयासाठी योग्य योग आणि आहार या संकल्पनेवर योग दिन साजरा केला. सांस्कृतिक, धार्मिक उत्सवांप्रमाणेच योगउत्सव असून योग, प्राणायाम, ध्यान हे दैनंदिन जीवनात अंगिकार करण्याचा संकल्प जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या सहकाऱ्यांनी केला.सात्विक आहारासह योगाचे महत्त्व जैन फूडपार्क, एनर्जी पार्क व अॅग्री पार्क च्या ९०० च्यावर सहकाऱ्यांनी योग आणि आहारातून आरोग्यमय जगण्याचा मंत्र समजून घेतला. योग प्रशिक्षीका कमलेश शर्मा यांनी स्वात्विक, राजसीक, तामसीक आहाराबाबत सांगितले.

सकस आहार असेल तरच मन शांत राहते. मन शांत ठेऊन शारिरीक व्याधींना दूर ठेवता येते, यासाठी रोज एक तास सूर्यनमस्कार करावे. यामूळे बाह्य शरीर, अवयव आणि मन यावर काम करता येते. चांगली झोप, भोजन, व्यायाम व प्राणायाम यातून उत्तम आरोग्य राखता येते. असे मार्गदर्शन करत सहकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकांसह योगाची विविध आसने  कमलेश शर्मा यांनी करून घेतले. त्यांचे स्वागत डॉ. जयश्री राणे यांनी केले. वरिष्ठ सहकारी रोशन शहा यांनी आभार मानले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल ढाके, सुनील गुप्ता, प्रदीप सांखला, व्ही. पी. पाटील, आर. बी. येवले यांच्यासह वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, भिकेश जोशी, आर. डी. पाटील यांच्यासह मानव संसाधन विभागाच्या सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

जैन प्लास्टिक पार्क येथे योगा दिवस साजरामानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांना संयमित करण्यासाठी योगाभ्यास ही उत्तम साधना आहे. २१ जून जागतिक योग दिनाच्या औचित्याने जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथील प्रशासकीय इमारतीसमोरच्या पटांगणावर योगगुरु सुर्यागीरीजी उर्फ सुभाषजी जाखेटे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करून घेतला. यावेळी कंपनीच्या सहकारी सौ. संगीता खंबायत यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्लास्टिक पार्क येथील सुमारे हजारहून अधिक स्त्री व पुरुष सहकारी उपस्थित होते. आरंभी कंपनीचे सहकारी किशोर बोरसे यांनी प्रास्ताविक केले. त्यात ते म्हणाले की, ज्या प्रमाणे मोठ्याभाऊंनी कार्याचा वारसा दिला त्याच प्रमाणे उत्तम आरोग्याचा मंत्र ही दिला.

सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे या दृष्टीने कंपनीत विविध उपक्रम राबविले जातात याबाबत त्यांनी सांगितले. सहकाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती, शरीरास हानिकारक असे चहा-कॉफी आणि मादक द्रव्य सेवनास बंदी तसेच कँटिनमधील जेवणात अत्यल्प प्रमाणातील तेल, मीठ, मिरची इ. अशा अनेक बाबींमधून श्रद्धेय मोठ्याभाऊंनी आपल्या सहकाऱ्यांच्या निरोगी आणि सुरक्षित आयुष्यासाठी नेहमीच काळजी घेतली. आजही मोठ्याभाऊंच्या प्रेरणादायी विचारांमध्ये अनेकदा सहकाऱ्यांच्या आरोग्य विषयक जागरूकता दिसून येते असेही त्यांनी सांगितले. सकाळी ८ वाजता सर्व सहकाऱ्यांनी ओंकाराने योगाभ्यासास सुरूवात केली. अर्ध तितली आसन, ताडासन, तिलक ताडासन, अनुलोम मिलोम, भ्रमरी प्राणायम करताना श्वास-उच्छवासाचे नेमके तंत्र त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखविले. या दिवसाच्या निमित्ताने काही सहकाऱ्यांनी वर्षभर योग करण्याचा संकल्प ही घेतला. अनिल जैन, राजेश आगिवाल, राजेश शर्मा, युवराज धनगर, हेमराज वाणी, महेंद्र पवार, योगेश नारखेडे, निलेश भावसार तर डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ.अनिल पाटील  यांनी परिश्रम घेतले.

जैन टिश्यूकल्चर पार्क
महिलांच्या निरामय आरोग्य या विषयावर कमलेश शर्मा यांनी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथे मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिनी जीवनात योग करण्याच्या पद्धती समजून सांगितले. विजयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक व स्वाग केले. यावेळी त्यांच्यासोबत विजयसिंग पाटील, सुरक्षा विभाग इंद्रजित कुमार, डॉ. अश्विनी पाटील, राजाराम देसाई, मानव संसाधन विभागाचे सी. पी. चौधरी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मानव संसाधन विभागाचे सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

अनुभूती निवासी स्कूल
डिव्हाईन पार्कच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योग दिनाचे महत्त्व समजून घेत योग साधना केली. प्रत्येक वर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवाय अनुभूती स्कूल निवासी असल्याने रोज सकाळी योगाचे विशेष सत्र घेण्यात येते. भारतीय संस्कृतीत ओमकार आणि प्रार्थनेचे महत्त्व अनुभूती स्कूलच्या निवासी डॉक्टर तथा योगशिक्षिका डॉ. स्नेहल पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडून त्यांनी ताडासन, कटिचक्रासन, त्रिकोणासन, गोमूखासन, मेरूदंड, वक्रासान, शशांकासन, भ्रमरी प्राणायम यासह विविध योगाभ्यास करून घेतला. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य देबासिस दास यांच्या उपस्थितीत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. दरम्यान अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलमध्ये सुद्धा योग दिवस साजरा झाला.

गांधी रिसर्च फाऊंडेशन
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या प्रांगणात सर्व सहकाऱ्यांनी विविध योगासने करून योग दिन साजरा केला. डॉ. गिता धरमपाल यांच्याहस्ते महात्मा गांधीजींची प्रतिमा व सूतीहार देऊन कमलेश शर्मा यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व आभार डॉ. अश्विन झाला यांनी केले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button