मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत उद्योजकता परिचय प्रशिक्षणाचे आयोजन व कर्ज मेळावा

टीम आवाज मराठी जळगाव | १५ जुलै २०२३ | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत मुक्ताईनगर येथे दिनांक २४/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता पंचायत समिती मुक्ताईनगरच्या सभागृहात कर्ज मेळावाचे आयोजन करण्यात येत आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान उद्योजकता प्रशिक्षण अर्ज व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा अर्ज मोफत पोर्टलवर भरून दिला जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सोबत आणावी १) शाळा सोडल्याचा दाखला २) मार्कशीट ३) जातीचा दाखला ४) पॅन कार्ड ५) प्रकल्प अहवाल इत्यादी सदरची योजना हि उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या कडून जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव राबवित आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना १५ ते ३५% पर्यंत अनुदान शासन देते तरी मुक्ताईनगर तालुक्यातील जास्तीत जास्त तरूण-तरूणींनी लाभ घ्यावा असे आवाहन आर एल चव्हाण जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जळगाव व चेतन पाटील महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले आहे आधिक माहिती व नाव नोंदणी साठी उद्योग निरिक्षक अनिल गाढे व विवेक रमेश सैंदाणे समन्वयक मोबा. नंबर ८२०८६६६४५८, दिनेश गवळे प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगाव यांच्याशी संपर्क करावे.