जळगाव

जामनेर सामरोद येथील तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या

सामरोद तळेगांव रस्त्याला लागून येणाऱ्या शेतामध्ये घडलेला प्रकार

टीम आवाज मराठी भानुदास चव्हाण जामनेर प्रतिनिधि  | २६  जुलै २०२३ | येथील जामनेर तालुक्यातील सामरोद येथे एका तरुण शेतकऱ्याने शेताला लागून असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रोजी बुधवार दि. २६  दुपारच्या सुमारास जामनेर तालुक्यातील सामरोद तळेगांव रस्त्याला लागून येणाऱ्या शेतामध्ये सदर प्रकार उघडकीस आला.  ज्ञानेश्वर अशोक वखरे वय वर्ष  ३१ असे आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत हाती मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर अशोक वखरे हे शेतात कोळपणी कामासाठी जातो असे सांगून आज सकाळी सुमारे १०  वाजता शेतात गेला. तो शेतीची कामे करीत होता.  तो शेताला लागून असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत निदर्शनास आला. त्याच्या वहीणींनी  त्यास खाली उतरवून वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामनेर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी ज्ञानेश्वर अशोक वखरे यांना मृत घोषित केले. ज्ञानेश्वर यांनी नेमकी कुठल्या कारणावरून आत्महत्या केली याचे कारण मात्र कळू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. जामनेर पोलिस स्टेशन येथे मृत्यू ची नोंद करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button