आत्माराम पाटील आवाज मराठी, चोपडा | २४ जून २०२३ | चोपडा तालुक्यातील लासूर येथील श्री नाटेश्वर महादेव मंदिर ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी दिंडी जात असते. २९ तारखेला आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील भाविकांना पंढरपूर येथील विठोबा-रखुमाईच्या दर्शनाची ओढ लागलेली असते.
चोपडा तालुक्यातील लासूर येथील ह. भ. प. बापू महाराज चौधरी व ह. भ. प. छोटू महाराज हे भाविकांना ना नफा ना तोटा या तत्वावर गावातील व परिसरातील भाविकांना पंढरीची वारी करत असतात. त्यानुसार सालाबादाप्रमाणे यंदाही ही वारी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली आहे. यात गावातील महिलांसह अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आहे.