जळगावात भव्य श्रीराम कथेचे आयोजन
कथाकार ह.भ.प. दादा महाराज जोशी; २० ते २४ जानेवारी पर्यंत चालणार कथा; आमदार राजूमामा भोळे यांचे आयोजन
टीम आवाज मराठी, जळगाव l २० जानेवारी २०२४ l अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत आहे. यापार्श्वभूमींवर शिवतीर्थ मैदान येथे आज दि. २० ते २४ जानेवारी पर्यंत ह.भ.प. दादा महाराज जोशी यांचे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून, शिवमहापुराण समिती व आ. राजूमामा भोळे मित्र परिवार यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी चिमुकले राम मंदीर येथे दुपारी १२.१५ वाजता श्रीराम गाथेचे पूजन व आरती आ. सुरेश भोळे (राजूमामा) व माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते व समिती सदस्य यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली.
आ. राजूमामा यांनी प्रभू श्रीरामाची गाथा आपल्या डोक्यावर घेऊन खुल्या जीप मध्ये विराजमान झाले. व चिमुकले राम मंदिर येथून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात श्रीराम गाथेचे कथास्थळ शिवतिर्थ मैदान येथे दुपारी १.०० वाजता आगमन झाले. या मिरवणूकीत सहभागी श्रीराम, सीतामाता, श्री लक्ष्मण व हनुमंत यांच्या सुंदर वेशभूषा बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते व कलश धारी महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत भव्य श्रीराम कथेचे निरुपण चिमुकले राममंदिराचे ह.भ.प. दादा महाराज जोशी यांनी आजच्या प्रवचनात रघुकुल परिचय व गंगा अवतरण या विषयीची कथा सांगितली.
कारसेवकांचा हृदयस्पर्शी सत्कार या दरम्यान, आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते जळगाव शहरातील अयोध्येतील कारसेवेमध्ये सहभागी झालेल्या सर्व जेष्ठ व दिवंगत तसेच कारसेवेकांचे अयोध्येतील श्रीराम मंदिरची प्रतिकृती व श्रीराम जय राम नावाची भगवी शाल देऊन सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यात सर्वात जेष्ठ सुलोचनाताई इखे, दिपकजी घाणेकर यासह ६५ कारसेवकांचा सन्मान करण्यात आले. यामध्ये उदय भालेराव, मंगेश कुलकर्णी, प्रल्हाद ठाकरे, राजेंद्र मराठे, मुकुंद मेटकर, दीपकराव घाणेकर, शशिकांत पाटील, रमेश जोगी, संजय सोनवणे, राजू मांढरे, सुशील भावसार, गीताजंली ठाकरे, हेमंत गौड, दिनेश गौड, नितीन चिंचोले, अभय कुलकर्णी, किरण बारी, शशिकांत रामदास पाटील, अभय सुरेश कुलकर्णी, भगवान सुर्जन सोनवणे, दिलीप बक्सु सपकाळे, चिंतमण भिवसन बाविस्कर, नामदेव उखा सपकाळे, महेश रामचंद्र सोनवणे, रमेश सपकाळे यासह कारसेवकांचे सत्कार करण्यात आले.
यासोबत दिवंगत कारसेवकांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. राम राम जय श्रीरामाच्या जय घोषात चिमुकले राममंदिराचे दादा महाराज जोशी यांच्या मधूरवणीत पाच दिवशीय कथेला मोठ्या उत्सहात सुरूवात करण्यात आली यात त्यांनी रामायणाचा आधार घेत आई, वडिल, भाऊ-बहिण, भाऊ-भाऊ, पती-पत्नी यांच्या नात्यांसंबंधांचे महत्त्व विषद केले. राम हा शब्द शरीरातील अग्नी प्रजज्वलीत करतो. ही अग्नी शरीराला बलवान करुन प्रतिकार शक्ती वाढवतो अन्यथा प्रतिकार शक्ती कमी होती, राम नाम हे शक्तीकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कथेच्या शेवटी जेष्ठ उपस्थित कारसेवक व आ. सुरेश भोळे (राजूमामा) मा. महापौर सीमाताई भोळे, भाजप जिल्हाअध्यक्षा महानगर उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस ज्योतीताई निंभोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.