जळगाव

जळगाव कारागृहमध्ये एका कैदीवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या कैदीवर घृणास्पद प्रकार

टीम आवाज मराठी जळगाव | २६ जुलै २०२३ | जळगावचे जिल्हा कारागृह कुठल्या-ना-कुठल्या निमित्ताने अथवा वादग्रस्त विषयात सदैव चर्चेत राहत असते, अश्याच प्रकारचा एक घृणास्पद प्रकार कारागृहात घडल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. खूनाच्या गुन्ह्यामध्ये जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या कैदीवर त्याच्या बॅरेकमधील इतर कैद्यांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची कुठेही वाचा केली तर सदर तरुणाला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध केला असता, सदर कैदीवर धारदार पट्टीच्या साहाय्याने वार करुन त्यास गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात चार कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहातील मध्ये खूनाच्या गुन्ह्यात असलेला २६ वर्षीय संशयिताला ठेवण्यात आले आहे. त्याच्यासोबत बॅरेक १ व २ मध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विक्की शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण या कैद्यांना ठेवले होते. दि. १२ रोजी त्या कैद्याला बाथरुममध्ये घेवून त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच कोणाला काही वाचा करण्याचा प्रयत्न केला, तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. पहाटे चार वाजेच्या सुमारास तो बंदी झोपलेला असतांना त्याच बॅरेकमधील विक्की शिंदे याने त्याला उठवून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या कैदीने त्यास नकार दिला असता, त्यांनी त्यास ठार मारण्याची धमकी देऊन त्यास लोखंडी पट्टीने त्या कैदीच्या मानेवर वार केले. मानेवर वार झाल्याने जखमी झालेला कैदी जमिनीवर कोसळल्यानंतर कैद्यांनी दिलेल्या धमकीला घाबरुन मानेला कापड बांधून झोपला. या घटनेबाबत कारागृहातील कैदीने त्या जखमी कैदीची विचारपूस केली. त्याने घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. हा प्रकार कारागृह प्रशासनाला माहिती पडताच त्यांनी कैदीला कारागृहातील इतर बॅरेकमध्ये हलविण्यात आले. दुसऱ्या बॅरेकमध्ये ठेवल्यानंतर देखील अत्याचार करणारे कैदी नेहमी त्याच्याजवळ येवून त्याला धमकी देतच होते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून त्या कैदीने घडलेली घटना दि.२० जुलै रोजी कारागृहातील अधिकाऱ्यांसमोर सांगितली. त्यांनी लागलीच कैदीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि त्यावर उपचार करण्यात आले. त्याच्यावर दमदाटी करुन अनैसर्गिक कृत्य करणारा कारागृहातील कैदी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ याच्यासह त्याचे मित्र लोखंडी पट्टीने वार करुन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मित्र विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button