जळगावराज्य

मनुदेवी परिसरात विद्यार्थ्यांनी घेतला चित्रकलेचा आनंद

चोपडा येथील चित्रकला महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

आत्माराम पाटील | आवाज मराठी चोपडा | दिनांक २८/८/२०२३

भगिनी मंडळ चोपडा येथील ललित कला केंद्राची मान्सून शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. या सहलीस पायाभूत वर्ग, ए.टी.डी. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष तसेच जी. डी. आर्ट पेंटिंग च्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


ही एक दिवसीय शैक्षणिक सहल श्री क्षेत्र मनुदेवी ता.यावल या प्रेक्षणीय स्थळी आयोजित करण्यात आली होती. या स्थळी या परिसरातील लहान-मोठे धबधबे व नैसर्गिक वातावरणाचे स्केचिग व निसर्ग चित्रण विद्यार्थ्यांनी केले.


भरपूर निसर्गिक वस्तूंचे चित्रण व रेखाकंनासह या नैसर्गिक वातावरणात वनभोजनाचा मनमुराद आनंदही लुटला.
याप्रसंगी प्राचार्य सुनील बारी प्रा. विनोद पाटील व प्रा. संजय नेवे यांनी देखील अभ्यास करत विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके दिली.
तर लिपीक भगवान बारी, सेवक अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी यांनी वेळोवेळी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button