विटनेर येथे महसूल विभागाचा जनसंवाद उपक्रम उत्साहात साजरा
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे मार्फत महसूल सप्ताहाचे आयोजन

टीम आवाज मराठी आत्माराम पाटील चोपडा प्रतिनिधि | ४ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे मार्फत संपूर्ण राज्यात दिनांक 1 ऑगस्ट २०२३ ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने हातेड मंडळ भागातील विविध गावांना महसूल सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत विटनेर येथे जनसंवाद या उपक्रमांतर्गत महसूल आदलतीचे आयोजन व सलोखा योजना,ई पीक पाहणी,ई हक्क व पि एम
किसान योजनेचे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केले होते. हातेड मंडळ भागातील खातेदारांना एकत्रित बोलावून त्यांचे ई पीक पाहणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले तसेच पी एम किसान योजनेचे लाभार्थी यांचे स्टेटस चेक करून त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यात आल्या सदर कार्यक्रमाला मंडळ भागाचे मंडळ अधिकारी रवींद्र माळी यांनी कार्यक्रमात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली ई पिक पाहणी , सलोखा योजना व ई हक्क प्रकल्पाबाबत तलाठी बुधगाव गजानन पाटील यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले तलाठी मोहिदा संतोष कोळी व तलाठी हातेड बुद्रुक आशिष निचीत ,तलाठी विटनेर आर के पाटील यांनी पी एम किसान योजनेचे अडचणी सोडवण्यासाठी आलेल्या खातेदार यांचे कडून तक्रारी स्वीकारून तात्काळ तक्रारी निर्गत केल्या तसेच जे पात्र लाभार्थी आहेत अशा पात्र चाळीस लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून पी एम किसान योजनेचा डाटा विहित नमुन्यात तयार केला. सदर कार्यक्रमासाठी विटनेर ग्रामपंचायत सरपंच कविता दिलीप पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.