जळगावराज्य

चोपडा तालुक्यातील सकल मराठा समाजाचा मुक रास्ता रोको आंदोलन

पोलिस निरिक्षकांसह तहसिलदारांना आंदोलकांनी दिले निवेदन, रास्ता रोकोमुळे वाहतुक काही काळ ठप्प

आत्माराम पाटील | आवाज मराठी चोपडा | दिनांक ०४ सप्टेंबर २०२३ 

जालना जिल्ह्यातील घटनेचा पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटत आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने चोपडा शहराच्या धरणगांव नाक्या जवळ मुक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यात जी घटना घडली. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व महाराष्ट्रातील संपुर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शांततेत मुक रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी तालुक्यातील सकल मराठा समाज एकवटला होता. दरम्यान या रास्ता रोको आंदोलन वेळी कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत. या आंदोलन मुळे काही काळ ट्राफिक जाम झाले होते. यासाठी चोपडा शहराच्या पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन स्थळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन स्विकारले. या आंदोलनात महिलांची उपस्थित लक्षणीय ठरत होती. या आंदोलनात समाजाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button