जळगाव

विठूनामाच्या गजरासह पर्यावरणाचा जागर

आषाढीनिमित्त चोपडा शहरातील महिला मंडळ शाळेची वृक्षदिंडी

आत्माराम पाटील, आवाज मराठी चोपडा। २८ जून २०२३ । ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी’ या विठूनामाच्या गजरासह ‘वृक्ष बोलती मानवाला – नका तोडू आम्हाला, हिरवी हिरवी गार गार – झाडे लावू चार चार, झाडांना जगवाल – तर सुखाने जगाल’ यासारख्या पर्यावरण जागराच्या घोषाने अवघा परिसर दुमदुमला होता. साधुसंतांनी विठुरायाबद्दलची कवने आणि अभंग लिहिताना निसर्गाचे, वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे. हा योग साधत आषाढी एकादशी निमित्त येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्यावतीने वृक्षदिंडी व पंढरीच्या विठुराया सोबतच बालतरुच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश शहरात देण्यात आला.


आरंभी वृक्ष दिंडीचे पूजन संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, कुमुदिनीबेन गुजराथी, छायाबेन गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, वसंतलाल गुजराथी, डॉ. आशिष गुजराथी, माजी गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, मुख्याध्यापक सुनील चौधरी, वनक्षेत्रपाल तुषार देवरे यांच्यासह अनेकांनी केले.

विद्यालयातून आरंभ झालेल्या या दिंडीचा गुजराथी गल्ली – गोल मंदिर – मुख्य बाजारपेठ – गांधी चौक – थाळनेर दरवाजा – धनगर गल्ली मार्गे शाळेत येऊन समारोप करण्यात आला. याठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.


विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. चौधरी व पर्यवेक्षक एस. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व्ही. वाय. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथक तयार करण्यात आले होते. एस. आर. सोनवणे, व्ही. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक पालखी सजविण्यात आली होती. पारंपारिक मराठमोळ्या वेषातील कलशधारी मुलींना वाय. टी. शिरसाठ, के. एन. देशमुख, एस. आर. माळी या शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले. मुलींच्या लेझीम पथकाला ए. आर. महाजन, व्ही. पी. महाले यांचे मार्गदर्शन लाभले. तर बाल वारकऱ्यांचे तालबद्ध संचलन एस. आर. बारी, पी. एस. चव्हाण यांनी करवून घेतले. बी. जी. माळी, सी. पी. चौधरी, बी. आय. लोहार, व्ही. यु. पाटील, व्ही. डब्ल्यू. पाटील, वाय. एन. बारी, एस. एम. भलकार या शिक्षकांसह डी. जे. मिस्तरी, एस. बी. पाटील, बी. बी. भालेराव या मदतनिसांनी परिश्रम घेतले. बी. ए. धर्माधिकारी, जी. जी. पाटील, आर. जी. गुजराथी, बी. एस. शिरसाळे यांचे सहकार्य लाभले.

विद्यालयाचे बँड पथक, पारंपारिक मराठमोळ्या वेषातील कलशधारी मुली,  वारकरी वेषातील टाळ वाजवणारे बाल वारकरी, लेझीम पथक, बालतरुची (रोपटे) सुशोभित पालखी यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीनंतर शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


चोपडा सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल तुषार देवरे, वनपाल रवींद्र भामरे, रविंद्र मोरे, महेश पाटील, आगार रक्षक किरण पाटील, वनरक्षक एस के कंखरे, अमोल पाटील, उज्वला बारेला, रिला पावरा, प्रमिला अंबुरे, जयश्री धनगर, गोविंदा चौधरी, मदन मराठे, विजय चौधरी, अंकुश भिल यांची दिंडी दरम्यान उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button