जळगाव

जळगावसह धुळे जिल्ह्याला यंदा प्रथमच पावसाचा यलो अलर्ट

आज उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक ८  सप्टेंबर २०२३ | : मागील तीन आठवड्याच्या नंतर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यासह राज्यात पाऊस आलेला आहे. यामुळे बळी राजा सुखावलेला असून खरीप पिकांना जीवनदान मिळाले. सध्या राज्यात सर्वत्र मान्सून चालू  झाल्यामुळे रविवारपर्यंत राज्यामध्ये सर्वच ठिकाणी मध्यम पाऊस चालू राहणार आहे. मात्र यंदा पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रात जळगावसह धुळे जिल्ह्याला आज दिनांक ८  सप्टेंबर २०२३ शुक्रवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यासह राज्यात पावसाने बऱ्याच वेळ विश्रांती घेतली होती. मात्र जुलै महिन्यात झालेल्या पावसावर खरीप पिकाच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने पाऊस नसल्याने पिके करपू लागली होती. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. शेतकऱ्यांसह इतर सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले होते.

हवामान खात्याने राज्यात या आठवड्यात पाऊस येणार असल्याचे म्हटलं होते. आता हवामान खात्याचा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरतानाचे चित्र दिसत आहे. मोठ्या कालावधी नंतर  मान्सून परतला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही प्रसन्न झाल्या आहेत.

मान्सून सक्रीय होण्यासाठी बंगालच्या उपसागरात बदललेली परिस्थिती कारण ठरली आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रीवादळच्या परिस्थिती सोबत अरबी समुद्रावरुन पश्चिमी वारे वाहू लागले आहे. यामुळे राज्यात सगळीकडे मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. यामुळे रविवारपर्यंत राज्यात सगळीकडे चांगलाच पाऊस असणार आहे. परंतु आज धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

पावसाचा जोर आणखी दोन, तीन दिवस कायम राहणार आहे. मोठ्या कालावधी नंतर मान्सून परतला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. आता सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला तर राज्यातील धरणांमध्ये जलसाठा चांगला निर्माण होईल. यामुळे रब्बीचा  हंगामपण  चांगला असेल असे अपेक्षित आहे. असे पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button