जळगावदेश-विदेशराज्य

“वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारासह फोटोग्राफरला देखील सन्मान पूर्वक वागणूक द्या”… जिल्हाधिकारी

अभिजित पाटील | आवाज मराठी, जळगाव| दिनांक १९/८/२०२३

जळगाव – प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही आज 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात आला आहे. जिल्हा पत्रकार भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आलं.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे अनिल जोशी, ज्येष्ठ पत्रकार विजय पाटील, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. सर्व छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:चा मोबाईल सुध्दा ठेवला पूजनासाठी….

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचा मोबाईल सुध्दा पूजनासाठी व्यासपीठावर ठेवला होता, व त्याचेही यावेळी पूजन केल्याने उपस्थितांचा आश्चर्यांचा धक्का बसला. यावेळी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी मनोगतात छायाचित्रकाराचे महत्व मोठे आहे. जे शब्दात व्यक्त करता येत नाही, ते फोटोतून व्यक्त केले जातात, गेल्या वेळी घोषणा छायाचिऋकारांसाठी करण्यात आली होती, ती पूर्ण न होवू शकल्याने त्यांनी मोठी खंत व्यक्त केली, महापौर जयश्री महाजन यांनी सुध्दा छायाचित्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या, एकदा खड्डयात महापालिकेचा प्रतिबिंब असा फोटा छापून आला होता, या फोटोतून काय त्या भावना नागरिकांपर्यंत पोहचल्या आणि प्रशासनापर्यंत पोहचल्या होत्या, असा अनुभव सुध्दा यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितला. तसेच आगामी काळात गेल्यावेळी छायाचित्रकारांसाठीच्या हॉलसाठी जागेची जी घोषणा केली होती, ती पूर्ण करण्याचा मानसही यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी बोलून दाखविला.

छायाचित्रकारांनी चर्चा करावी, आवश्यक त्या बाबींसाठी पाठपुरावा करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी छायाचित्रकारांचे महत्व विषद करतांना त्यांच्या पत्रकार म्हणून काम करतांनाच्या आठवणींना उजाळा दिला. छायाचित्रकारांच्या नेहमी मी पाठीशी आहे, कुठल्याही गोष्टींची आवश्यकता असल्यास चर्चा करावी, या गोष्टी मार्गी लावण्यासाठी आपण पाठपुरावा करु असं आश्वासनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित छायाचित्रकारांना दिले. तसेच छायाचित्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. फाउंडेशनचे अध्यक्ष- हेमंत पाटील जळगावकर, सचिव- अभिजीत पाटील, सहसचिव- संदिपाल वानखेडे, माजी अध्यक्ष- सुमित देशमुख, सचिन पाटील, अरूण इंगळे, जुगल पाटील, पांडुरंग महाले, धर्मेंद्र राजपूत, भुषण हंसकर, नितीन नांदुरकर, किशोर पाटील, आयाज मोहसिन, गोकुळ सोनार, नितीन सोनवणे, काशिनाथ चव्हाण, संदीप होले, विक्रम कापडणे, सोनम पाटील, शैलेंद्र सोनवणे, रोषन पवार, शैलेश पाटील, चित्रनीश पाटील, राणाजी, राजू हरीमकर, राजू माळी, संजय वडनेरे, बंटी बारी यांच्यासह सर्व सदस्य मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे सुमीत देशमुख यांनी केले, प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button