शिक्षक दिनानिमित्त उर्वेश साळुंखे यांच्याकडून शिक्षकांचा अनोख्या पद्धतीने सन्मान

आत्माराम पाटील | आवाज मराठी चोपडा | दिनांक ५ सप्टेंबर २०२३
चोपडा :- मानवी जन्मात शिक्षकाला एक आदर्श मानले जाते चांगला व्यक्ती घडणाऱ्या मागे शिक्षक याचा मोठा हातभार असतो. या अनुषंगाने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी बुधगाव व अनवर्दे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाचा सन्मान म्हणून शिक्षकांचे पायधुन व सत्कार करून एक आदर्श उपक्रम राबवला आहे. या प्रसंगी मुख्याध्यापक रविंद्र पाटील शिक्षक वासुदेव नन्नवरे, भूपेंद्र महाजन व विद्यार्थी उपस्थित होते.

संपूर्ण भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला.डॉ.राधाकृष्णन हे विद्वान आणि शिक्षक होते.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शिक्षणाप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि शिक्षकांबद्दलचा आदर पाहून त्यांचा वाढदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
आपले पालक आपल्याला जन्म देतात आणि शिक्षक योग्य मार्गदर्शनाने आपले भविष्य उज्ज्वल करतात. त्यामुळेच आपल्या पालकांपेक्षा शिक्षकांचे स्थान वरचे असते असे म्हणतात. कारण शिक्षणाशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. आपल्या शरीराला जशी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी शिक्षणाची गरज असते.
केवळ शिक्षकच नि:स्वार्थीपणे शिक्षण देऊ शकतात. आपल्या शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल आपण नेहमी आदर केला पाहिजे.