सत्रासेन आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे
चोपडा तालुक्यातील सत्रासेन आश्रमशाळा येथे योगदिवस साजरा
आत्माराम पाटील, आवाज मराठी चोपडा | २१ जून २०२३ |
चोपडा तालुक्यातील सत्रासेन आश्रमशाळा येथे योगदिवस साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना योगदिवसाची माहिती, जीवनातील महत्व व निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी लाभ या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती योग शिक्षक भालचंद्र पवार, महेशकुमार शिंदे यांनी योग प्रात्यक्षिक व सविस्तर माहिती देऊन जागृती केली.
सर्व विद्यार्थ्यांनी योग दिवसाच्या निमित्ताने प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला. संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भादले, मुख्याध्यापिका, सरपंच वंदना भादले, जगदिश महाजन, नरेंद्र देसले, मनोज पाटील, योगेश पाटील, झुलाल कंरकाळ, गजानन पाटील, संजय शिरसाळे, कैलास महाजन, अधिक भादले, उदय वानखेडे, विकास कोळी, योगेश पाटील, अनिल राणे, मनोज महाजन, शितल पाटील, नरेंद्र महाजन आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी चतुर्थ कर्मचारी यांनी मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले व संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय भादले यांनी योगदिनाबद्दल शुभेच्छा दिल्या.