टीम आवाज मराठी जळगाव | ३ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्राचे निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित ना.धों.महानोर ( वय 81 ) यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी 8,30 वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले,
त्यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख आहे . दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी काम केले होते, ते पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जात तसेच हायटेक ऍग्री कल्चर शेतीचे ते पुरस्कर्ते होते. आमच्या परिवाराचे जेष्ठ सदस्य असलेल्या महानोर दादांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.
अशोक जैन
भवरलाल अँड कांताबाई जैन परिवार
भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन
गांधी रिसर्च फाऊंडेशन
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट
व जैन इरिगेशन सिस्टिम्स ली
चे सहकारी