
टीम आवाज मराठी, अडावद, ता. चोपडा दि. 03 ऑक्टोबर 2024 :– ओट्यावर झोपलेल्या 35 वर्षे तरुणाकडे तंबाखू मागणाऱ्या दोघांनी तंबाखू न दिल्याने त्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना एक ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली होती .या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे वेगात फिरवून सीसीटीव्ही फुटेज वरून अवघ्या बारा तासात अल्पवयीन मुलासह एका तरुणाच्या मुस्क्या आवळल्या.असून त्यास २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एका विधी संघर्ष बालकास बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

अडावद येथील के. टी. नगरच्या मागील भागात सध्या लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या बापू हरी महाजन उर्फ गरीब (वय २८, मूळ रा. खर्ची, ता. एरंडोल) यांची लाकडी दांडा व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.होती. या खुनाच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात उलगडा केला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी काल रात्री आडगाव येथील वडगाव रोडवरील खालच्या माळीवाडा राहणाऱ्या राज सुरेश महाजन (वय १९) यात अटक केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.
संशयिताला बुधवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यास २ दिवसांची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणी एका अल्पवयीन विधी संघर्ष बालकास जळगाव येतील बाल न्यायालयात हजर केले असता त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.