जळगाव

जळगाव मनपाचे सभागृह अत्याधुनिक पद्धतीचे होणार

जळगाव मनपाच्या सभागृहास सी.एस.आर फंडातुन ५ कोटींची मंजुरी

टीम आवाज मराठी, जळगाव। १३ जुलै २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या सतरा मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेले सभागृह आता अजून आलिशान पद्धतीचे होणार असुन यासाठी ५ कोटींचा खर्च करण्यात य़ेणार आहे. एकूण १०० नगरसेवक बसतील इतकी क्षमतेचे असणार असुन याठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. या सभागृहासाठी ५ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. सी.एस.आर फंडातुन हे काम करण्यात येणार आहे. वास्तुविशारद नीरज मंत्री यांनी सदर आराखडा सादर करण्यात आला. व त्यास पण मंजुरी देण्यात आली. त्या संदर्भात निविदा काढून सप्टेंबरमध्ये कामाला सुरवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात नूतनीकरण आराखडा मंजुरीसाठी बैठक झाली.उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आश्‍विन सोनवणे, गटनेते राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, वास्तु विशारद मंत्री व अधिकारी उपस्थित होते.

महापौर व उपमहापौर यांनी सांगितले, की महासभेमध्ये सभागृह नूतनीकरणाचा ठराव मंजूर केला. त्यासाठी पाच कोटी रुपये सीएसआर फंडातून खर्च करण्यात येणार. महानगरपालिकेत सद्यस्थितीत ७५ नगरसेवक बसण्याची सुविधा आहे. आगामी काळात प्रभाग वाढीसह नगरसेवकांची संख्या वाढण्याचे लक्षात घेऊन तब्बल १०० नगरसेवक बसण्याची सुविधा करण्यात येणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button