जळगाव

आरोपीला अटक करण्यासाठी व कठोर शिक्षेच्या मागणीसाठी चिमुकल्याच्या आई व नातेवाईकांनी गाठले भडगाव पोलीस स्टेशन

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना

टीम आवाज मराठी सतीश पाटील भडगाव प्रतिनिधी | २ ऑगस्ट २०२३ | येथील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कल्याणी संजय पाटील वय सात वर्ष नऊ महिने रविवार दिनांक २७ रोजी सायंकाळी घरी मिळून न आल्याने मुलीच्या अपहरणाची केस पालकांनी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले होते त्यानंतर १ ऑगस्ट रोजी मुलीचा कुजलेला मृतदेह त्यांच्या घरा जवळील शेतकऱ्यांच्या कडबा कुटीत मिळवून आल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र २४ तास उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने गावातील महिला व स्वतः चिमुकलीची आई नातेवाईक यांनी भडगाव पोलीस स्टेशन काठून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता अखेर भडगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय राजेंद्र पाटील एपीआय साहेब व पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून आम्ही आरोपीला कठोर शिक्षा देण्याची ग्वाही दिल्याने सायंकाळी सात वाजता चिमुकलेचा मृतदेह गोंडगाव गावात आणून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button