
टीम आवाज मराठी जळगाव | २३ जून २०२३ |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होत असलेल्या जळगाव दौरा संदर्भात एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. वारंवार मुख्यमंत्री यांचे जळगाव दौरे लागत असले तरी जिल्ह्यासह राज्यातील विकास कामांना ब्रेक लागल्याचं खडसे यांनी वक्तव्य केलंय. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे अद्याप शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’ योजना राबवीत आहेत. मात्र, त्याचा फायदा जनतेला होत नसल्याचं देखील खडसे यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्यातील या सर्व महत्वाच्या विषयासंदर्भात मंगळवार दि. २७ पर्यंत मार्ग न काढल्यास जळगाव येथे मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी दिला. (Eknath Khadse on cm eknath shinde, Devendra fadnavis jalgaon news)
जळगाव येथील खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभय्या पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगला पाटील, राष्ट्रवादी युवक आघाडीचे रवींद्र पाटील यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ ही राज्य सरकारची महत्वकांशी योजना आहे. परंतु जिल्ह्यात असलेल्या अनेक समस्या, अडचणी यामुळे जिल्ह्यातील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे या योजनेच्या उद्घटन प्रसंगी येत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकनाथ खडसे यांनी काव्यात्मक टीका देखील केली. त्यासंदसर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा..
आमदार खडसे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यात चौथ्यांदा येत आहेत. बंडात त्यांना जिल्ह्यातील पाच आमदारांनी खोक्यांमुळे, की त्यांच्या प्रेमामुळे साथ दिली, हे मी सांगू शकत नाही. ‘खोके’ हा शद्ब त्यांच्याच आमदारांनी सांगितला आहे. मात्र, चौथ्यांदा येऊनही जळगाव जिल्ह्यात कोणताही विकास झालेला दिसत नाही.
जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. कापूस भावाचा गंभीर प्रश्न आहे. भाव नसल्यामुळे अद्यापही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. शासनाने कापसाला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी आपली मागणी खडसे यांनी केली आहे. संपुर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा..