महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गटस्तरीय समरगीत स्पर्धेत विचारदीप फाउंडेशन द्वितीय
ललीतकला भवन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गटस्तरीय समरगीत आयोजित स्पर्धा
टीम आवाज मराठी जळगाव | २६ जुलै २०२३ | जळगाव येथील ललीत कला भवन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गटस्तरीय समरगीत / स्फुर्ती गीत स्पर्धा २०२३-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेत विचारदीप फाउंडेशन, जळगावने ग्रुपने “प्रिय आमचा हिंदुस्थान” हे समरगीत सादर केले असून त्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष राम पवार संचालक गस सोसायटी, दिनकर कोळी वर्कींग कमिटी मेंबर हेड क्वार्टर मुंबई, सुनील पाटील सेफ्टी मॅनेजर रेमंड लिमिटेड, जळगाव यांच्या हस्ते दोन हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र पारितोषिक वितरण करण्यात आले.
या गीताला गीत कंपोजर मनोज बोदडे, ढोलकी वादक मोहित सोनवणे, डफ वादक हेमंत चौधरी, विनोद सोनवणे गायक कलाकार चैताली पाटील, देवांशी गुरव, निकिता बारी, श्रुतिका महाले, नितिन वाल्हे, रूपेश शिंदे, रोहन चव्हाण, हृषिकेश खोडपे, ज्ञानेश्वर सोनवणे या कामगार कलाकारांनी उस्फूर्तपणे गीत सादर केले.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ऐश्वर्या परदेशी, विशाखा देशमुख, मोहन रावतोळे यांनी काम बघितले तर जळगावचे कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी, कल्याण निरिक्षक भानुदास जोशी उपस्थित होते आभार शेखर पाटील यांनी मानले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विवेक सैंदाणे व सचिव महेंद्र महाजन यांनी सर्व वादक व गायकांचे अभिनंदन केले सदर स्पर्धेसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य स्पर्धेकांनी सहभागी झाले होते.