जळगाव

वाडे येथे मयत माकडाची अंत्ययाञा

गावक-यांनी एकत्र येऊन दिला अखेरचा निरोप

सतीश पाटील आवाज मराठी, भडगाव | दिनांक 10 सप्टेंबर 2023 
भडगाव तालुक्यातील वाडे येथे आज सकाळी ७:०० वाजता जूनेगांव जि.प.प्राथ.मराठी मुला/मुलीची शाळा मागील वस्तीत ईश्वर बाळू भिल्ल यांच्या घरा शेजारी पडीत जागेत एक माकड मृत अवस्थेत आढळून आले. ही बातमी गावात वार्‍यासारखी पसरल्याने गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्या मृत माकडास गावातील श्री राम मंदिर येथे आणण्यात आले. हिंदू धार्मिक पध्दतीने त्याला आंघोळ घालून नवीन कपडे घातले. त्याची पूजादेखील करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावभर अंत्ययाञा काढण्यात आली. जसजशी अंत्ययाञा पूढे जात होती, तसतशी गावातील महिला येऊन माकडाची ओवळणी करत होत्या.

अंत्ययाञेत सहभागी होत होत्या. ही अंत्ययाञा गावाबाहेरील हनूमान मंदिराजवळ येऊन थांबली. तिथे मंदिराच्या पायरी शेजारी मोठा खड्डा करण्यात आला होता. या खड्ड्यात रितीरिवाजानूसार माकडाचे अंत्यविधी करण्यात आले. तसेच माकडाचा गावात मृत्यु झाल्याने त्याचा अंत्यविधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button