राज्य

मध्यप्रदेशातून येणारा लाखोंचा गुटखा पकडला….. मलकापुर शहर पोलीसांची कारवाई…

मध्यप्रदेशातून येणारा लाखोंचा गुटखा पकडला..... मलकापुर शहर पोलीसांची कारवाई...

टीम आवाज मराठी, बुलढाणा | १२ जुलै २०२३ | मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे होणारी गुटख्याची वाहतूक रोखण्यात मलकापुर पोलिसांना यश आले आहे. मालवाहु बोलेरो या वाहनामधून गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून असलेले वाहनासह राज्यात बंदी असलेला विमल गुटख्यासह सुमारे १६ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेख इतराम शेख हुसेन वय २४ रा. तेलीपुरा बुऱ्हानपुर, शे.सलमान शे.अनवर वय २० रा. तेलीपुरा बुऱ्हानपुर व अरुण मधुकर राठोड वय ३२ रा. छोटी बोरगाव बुऱ्हानपुर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेल्या विमल गुटख्याची मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती मलकापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. १२ जुलै मंगळवार रोजी मुंबई – नागपूर महार्गावरील मलकापुर जवळच्या उड्डाणपुलावर सापळा लावण्यात आला होता. पोलिसांनी मालवाहु वाहन बोलेरो एमएच २८ बी बी २८६० ही गाडी अडवून सदर गाडीची तपासणी केली असता या वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा मोठा प्रमाणात असलेला साठा पोलिसांनी हस्तगत केला असून याप्रकरणी तिन्ही संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत त्यांनी मध्यप्रदेश राज्यातून विमल गुटखा खरेदी व विक्रि करत असल्याची कबुली दिली आहे. पोलिस तपासात सदरील वाहन बोलेरो गाडी मध्ये सुमारे ११ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आढळून आला आहे.

याप्रकरणी मलकापुर शहर पोलिस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, मलकापुर शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, पी एस आय अशोक रोकडे, पोलीस पो.काॅ अमोल शैले,शरद मुंडे, आनंद माने, राठोड आदींच्या पथकाने केली. मलकापुर शहर पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button