राज्य

धक्कादायक! शिक्षकदिनीच शिक्षकीपेशाला काळीमा, सातवीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानेच केले अत्याचार…

एकीकडे देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो आणि एकीकडे महाराष्ट्रात शिक्षकीपेक्षाला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

टीम आवाज मराठी नांदेड प्रतिनिधि | ६ सप्टेंबर २०२३ | येथील नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नराधम आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये निदर्शनास आली आहे. किनवट येथील जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळं पालकांच्या मनातही भीती निर्माण झाली आहे. सदर आरोपीचे नाव जितेंद्र धोंडे असं आहे. सदर आरोपी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील मूळ रहिवासी असलेला शिक्षक जितेंद्र धोंडे हा किनवट मधील माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. आरोपीने मुलीला आमिष दाखवून तब्बल तीन दिवस म्हणजेच २२, २३ व २४ ऑगस्ट रोजी आपल्या गोकुंदा येथील घरी नेऊन नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीला झालेल्या प्रकाराबाबत घरी न सांगण्याबाबत धमकी दिली. या सगळ्या प्रकाराने अल्पवयीन मुलगी भीतीने धास्तावली गेली या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी घाबरली होती. नंतर मुलीने शाळेत जाण्यासहीअसमर्थता दर्शविली. तेव्हा मुलीच्या आईला थोडी शंका आली व त्यानंतर आईने खोलात जाऊन विचारपूस केली. आईने प्रेमाने समजविले त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

अल्पवयीन मुलीसोबत घडलेला धकादायक प्रकार उघड झाल्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत संबंधित शिक्षकां विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे याच्याविरुद्ध कलम 376 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षक दिनाच्या दिवशीच ही घटना निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button