
अभिजित पाटील, आवाज मराठी जळगाव | २६ जून २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दि. २७ रोजी ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या उद्घाटनासाठी जळगाव दौऱ्यावर आहेत. परंतु विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाने नागरिकांच्या अनेक प्रलंबीत मागण्या पुर्ण होत नसल्याने मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात खडसे यांनी निषेध व्यक्त करू नये, यासाठी सरकारी पातळीवर शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचं एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं आहे. स्वतः मुख्यमंत्री व त्यांचे स्वीय सहाय्यक खडसे यांच्या संपर्कात असल्याची माहिती, एकनाथ खडसे यांनी दिली आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवणार असल्याचं वक्तव्य करणारे एकनाथ खडसे निषेध करतील की नाही ? असा प्रश्न निर्माण झालाय. (या विषयासंदर्भात एकनाथ खडसे काय म्हटले ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओला क्लिक करा. )