टीम आवाज मराठी, मुंबई | ०७ जुलै २०२३ | महाराष्ट्रातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन फक्त १५ दिवसाचं होणार आहे. आज विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.गत वर्षी एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने अधिवेशन गाजले होते. यंदा अजित पवार यांनी बंड केल्याने हे अधिवेशन गाजणार आहे का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान विधिमंडळ कामकाज बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आदी उपस्थित होते. हे अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत असेल.
या बैठकीकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विधान भवनसाठी रवाना झाले. नंतर काही वेळात विधानसभा कामकाज सल्लागार समिती आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आहे. यंदा अजित पवार यांनी बंड केल्याने हे अधिवेशन गाजणार आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार विधिमंडळात येताना ५० खोके एकदम ओके अशा घोषणांनी विरोधक आवाज देत होते तेव्हा अजित पवारही त्यात सहभागी व्हायचे. आता त्यांच्या विरोधात यंदा घोषणाबाजी होते का नाही हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. नव्हे तर विधान भवनामध्ये आणि विधान भवन बाहेर विरोधी पक्षाची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.