जळगाव

मंत्री अनिल पाटील यांचे जळगावात जल्लोषात स्वागत

मंत्री अनिल पाटील यांचे जळगावात जल्लोषात स्वागत

टीम आवाज मराठी, जळगाव | ०७ जुलै २०२३ | नुकतेच महाराष्ट्रात अजित पवार यांनी राजकीय क्षेत्रात नवीन भूकंप घडवून आणला. त्यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि या सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर यांच्या सह आठ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचा देखील त्यात सहभाग आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यांनंतर प्रथमच अनिल पाटील आज सकाळी रेल्वेनं जळगावात दाखल झाले. यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत केले . जळगावात आगमन होताच त्यांनी आज मोठा दावा केला आहे.


“वाट बघा सध्या आम्ही ४४ प्लस आहोत. काही दिवसांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याकडे असेल”; असा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीमधून अजित पवार गट बाहेर पडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या ५३ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा अजित पवार गटाला आहे. याबाबत सध्या विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.

अनिल पाटील हे अमळनेर मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत निवडून आल्यावर पहिल्यांदाच आमदार झाले आणि मंत्रिपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. मंत्री झाल्यानंतर अनिल पाटील हे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याने अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांचं जळगाव स्टेशनवर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button