पारोळा : येथील श्री बालाजी महाराज मंदिराच्या रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून १४ रोजी महिलेचे सोने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पारोळा पोलिसांत वर्धमान नगरमधील निकिता जाधव यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, १४ रोजी दुपारी १ ते १५ रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान शहरातील बालाजी मंदिर परिसरातील रथ चौकात अज्ञात चोरट्यांनी निकिता जाधव यांची ६ ग्रॅम वजनाची पोत चोरुन नेली. या पोतमध्ये २ वाट्या, ३५ लहान सोन्याचे मनी मंगळसूत्र होते. २० हजारांचे हे सोने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरून नेल्याप्रकरणी पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते करत आहेत.