बालरंगभूमी परिषदेतर्फे गोदावरी फाऊंडेशनच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील बालकांच्या सर्वांगिण कलाविकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कलावंतांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या उपक्रमात महाराष्ट्रातील बालरंगभूमी परिषदेच्या सर्व शाखा या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत आहेत. बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे गोदावरी फाऊंडेशनच्या सहकार्याने आज (दि.७) सकाळी १० वाजता डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय संचलित महादेव हॉस्पिटल, जुने गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते होणार असून, या शिबिरात हृदयरोगतज्ञांकडून तपासणीसह टूडी इको – इसीजी, रक्तातील शुगर, रक्तदाब आदींची तपासणी करण्यात येणार करण्यात येणार आहे. तरी शहरातील कलावंतांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.