जळगाव शहरातील नवीन बस स्थानक येथील घटना
टीम आवाज मराठी,जळगाव दि. 07 ऑक्टोबर 2024 जळगाव:-जळगाव शहरातील नवीन बस स्थानक येथील घटना शहरातील नवीन बस स्थानक येथे भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून गेल्या दोन-तीन दिवसात महिलांच्या पर्समधून पन्नास हजार आणि एक लाख रुपयांची रोकड लांबविण्याची घटना ताजी असताना पाच रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील अजंदे गावातील शेतकऱ्यांच्या खिशातून एक लाख रुपयांची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अजंदे तालुका धुळे येथील रहिवासी असलेले महेंद्र राजाराम मराठे व 35 हे कामानिमित्त जळगावत आले असता पाच रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बस स्थानक येथे जळगाव मांजरोद या बस मध्ये चढत असताना त्यांच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आले. सर्वत्र शोध घेऊनही चोरट्यांचा थांबताना लागल्याने अखेर महेंद्र मराठे यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप पाटील करीत आहे.
पोलिस नेमकं करताय काय… ?